छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो): पावसाने जोरदार हजेरी लावताच छत्रपती संभाजीनगर विभागातील टँकरची संख्या झपाट्याने घटली आहे. अवघ्या १५ दिवसांपूर्वी म्हणजेच २७ जुलै रोजी विभागात ४२८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, १० ऑगस्टपर्यंत ही संख्या थेट शंभरीच्या आत आली असून, आजघडीला केवळ ९६ टैंकर
सुरू आहेत. विशेष म्हणजे जालना, बीड आणि धाराशिव हे तीन जिल्हे वगळता विभागातील उर्वरित सर्व जिल्हे टँकरमुक्त झाले आहेत.
जुलै महिना सुरु होऊनही पावसाचा पत्ता नसल्याने संभाजीनगरसह सर्वच जिल्ह्यात पाणीटंचाईने पुन्हा डोके वर काढल्याने पुन्हा टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु झाला. परिणामी ऐन पावसाळ्यात
(दि.२७) विभागातील एकूण २५७ गावे आणि १३० वाड्या तहानलेल्या होत्या. यासाठी ४२८ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. यात सर्वाधिक २२४ टैंकर एकट्या संभाजीनगर जिल्ह्यात सुरु होते. दरम्यान, वरुणराजाने कृपादृष्टी केली आणि पाण्याचे दुर्भिक्ष बऱ्याच अंशी कमी झाले. जुलै अखेरपर्यंत टँकरच्या भरवश्यावर असलेल्या सर्वच जिल्हे
जलसाठ्यात वाढ
▶ जून महिन्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने अनेक भागांतील भूजलपातळी पुरेशी वाढलेली नव्हती, त्यातच जुलैच्या मध्यापर्यंत पावसाने म्हणावी तशी हजेरी न दिल्याने अनेक ठिकाणी पाणीटंचाई कायम होती. आहे. दरम्यान, जुलैच्या दुसऱ्या टप्प्यापासून सर्वत्र पाऊस सुरु झाला. दमदार हजेरीसह ऑगस्टमध्येदेखील अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे जलसाठ्यात वाढ होत आहे.
एक एक करून टँकरमुक्त होत आहेत. आजघडीला केवळ जालना, बीड आणि धाराशिव जिल्हे वगळता इतर सर्व जिल्हे टँकरमुक्त झाले आहेत. या तीन जिल्ह्यांत पाणीटंचाई कायम असल्याने येथे एकूण ९६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे.
१० जुलै रोजीच्या शासकीय टँकर अहवालानुसार मराठवाड्यातील ४२
गावांमध्ये आणि ३२ वाड्यांमध्ये एकूण ९६ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. यासाठी ३ शासकीय व ९३ खासगी टैंकर कार्यरत असून ४३१ विहिरी अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत. यात छत्रपती संभाजीनगरसह, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यात एकही टैंकर सुरु नाहीत.














